पॅरिसकडे जाणारे एमिरेट्सचे एअरबस ए३८० विमान
ह्युस्टनमध्ये उतरणारे एमिरेट्सचे बोईंग ७७७ विमान
एमिरेट्स (अरबी : طَيَران الإمارات ) ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या दोन राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनींपैकी एक आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली एमिरेट्स जगातील सातव्या क्रमांकाची व मध्य पूर्वेमधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एमिरेट्सची विमाने एकूण १४२ ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. एतिहाद एअरवेजप्रमाणे एमिरेट्स देखील संयुक्त अरब अमिराती सरकारच्या मालकीची आहे.
इतिहास
एमिरेट्सची रचना १९८५मध्ये झाली. दुबईच्या शाही घराण्याने व सरकारने दिलेले १ कोटी अमेरिकन डॉलरचे भांडवल वापरून या कंपनीने वाहतूक सुरू केली. सुरुवातीस पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्सने एमिरेट्सला तांत्रिक आणि प्रशासकीय मदत केली तसेच आपले एक बोईंग ७३७-३०० आणि एरबस ए३०० प्रकारची विमाने भाड्याने दिली. दुबई रॉयल एर विंग या शाही कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीने आपली दोन बोईंग ७२७-२०० प्रकारची विमाने या कंपनीस वापरण्यास दिली. एमिरेट्सने आपले पहिले उड्डाण २५ ऑक्टोबर, १९८५ रोजी दुबई -कराची दरम्यान केले.
विमानांचा ताफा
देश व शहरे
देश
शहर
अल्जिरिया
अल्जियर्स
ॲंगोला
लुआंडा
आर्जेन्टिना
बुएनोस आइरेस
ऑस्ट्रेलिया
ॲडलेड , ब्रिस्बेन , पर्थ , मेलबर्न , सिडनी
ऑस्ट्रिया
व्हियेना
बहरैन
मनामा
बांग्लादेश
ढाका
ब्राझील
रियो दि जानेरो , साओ पाउलो
कॅनडा
टोरॉंटो
चीन
बीजिंग , क्वांगचौ शांघाय
सायप्रस
लार्नाका
चेक प्रजासत्ताक
प्राग
कोत द'ईवोआर
आबिद्जान
डेन्मार्क
कोपनहेगन
इथियोपिया
अदिस अबाबा
इजिप्त
कैरो
फ्रान्स
ल्यों , नीस , पॅरिस-चार्ल्स दि गॉल
जर्मनी
फ्रांकफुर्ट , ड्युसेलडॉर्फ , हांबुर्ग , म्युनिक
घाना
आक्रा
ग्रीस
अथेन्स
हाँग काँग
हाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ )
भारत
दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ), मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ), अहमदाबाद (सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ ), बंगळूर (बेंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ ), कोलकाता (नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ ), चेन्नई , (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ ), कोची (कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ ), कोझिकोड (कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ ), त्रिवेंद्रम (त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ ), हैदराबाद (हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ )
इंडोनेशिया
जाकार्ता
इराण
तेहरान
इराक
बगदाद , बसरा , एर्बिल
आयर्लंड
डब्लिन
इटली
मिलान , रोम , व्हेनिस
जपान
ओसाका , तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ )
जॉर्डन
अम्मान
केन्या
नैरोबी
कुवेत
कुवेत शहर
लेबेनॉन
बैरूत
मलेशिया
क्वालालंपूर
मालदीव
माले
माल्टा
व्हॅलेटा
मॉरिशस
पोर्ट लुईस
मोरोक्को
कासाब्लांका
नेदरलँड्स
अॅम्स्टरडॅम (अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल )
न्यू झीलंड
ऑकलंड , क्राइस्टचर्च
नायजेरिया
लागोस
ओमान
मस्कत
पाकिस्तान
इस्लामाबाद , कराची , लाहोर , पेशावर
फिलिपिन्स
मनिला
पोलंड
वर्झावा
पोर्तुगाल
लिस्बन
कतार
दोहा
रशिया
मॉस्को , सेंट पीटर्सबर्ग
सौदी अरेबिया
दम्मम , जेद्दाह , रियाध , मदिना
सेनेगाल
डकार
सेशेल्स
माहे
सिंगापूर
सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ )
दक्षिण आफ्रिका
केप टाउन , जोहान्सबर्ग , डर्बन
दक्षिण कोरिया
सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ )
स्पेन
बार्सिलोना , माद्रिद
श्री लंका
कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ )
सुदान
खार्टूम
स्वीडन
स्टॉकहोम
स्वित्झर्लंड
जिनिव्हा , झ्युरिक
टांझानिया
दार एस सलाम
थायलंड
बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ ), फुकेत
ट्युनिसिया
ट्युनिस
तुर्कस्तान
इस्तंबूल
युगांडा
एंटेबी
युक्रेन
क्यीव
संयुक्त अरब अमिराती
दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ )
युनायटेड किंग्डम
बर्मिंगहॅम , ग्लासगो , लंडन (लंडन-हीथ्रो
), मॅंचेस्टर , न्यूकॅसल अपॉन टाइन
अमेरिका
डॅलस , ह्युस्टन , लॉस एंजेल्स , न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ ), सॅन फ्रान्सिस्को , सिॲटल , वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ )
व्हियेतनाम
हो चि मिन्ह सिटी
येमेन
साना
झांबिया
लुसाका
झिंबाब्वे
हरारे
बाह्य दुवे
^ "संग्रहित प्रत" . Archived from the original on 2015-04-29. 2015-04-30 रोजी पाहिले .
^ a b "DUBAI: Boeing formally launches 777X family with 259 commitments" . Flightglobal.com. 17 November 2013 रोजी पाहिले .