केट ब्लॅंचेट

केट ब्लॅंचेट
जन्म Catherine Élise Blanchett
१४ मे, १९६९ (1969-05-14)
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रेलिया
कार्यक्षेत्र हॉलीवूड अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९२ - चालू

केट ब्लॅंचेट (इंग्लिश: Cate Blanchett; १४ मे १९६९) ही एक ऑस्ट्रेलियन सिने अभिनेत्री आहे. १९९२ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी ब्लॅंचेट १९९८ सालच्या शेखर कपूर दिग्दर्शित एलिझाबेथ ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटासाठी तिला बाफ्टागोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. २००४ सालच्या द एव्हियेटर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. २००१-४ दरम्यान तिने द लॉर्ड ऑफ द रिंग्ज ह्या चित्रपट शृंखलेमध्ये गॅलाड्रियेल ह्या पात्राची भूमिका केली होती.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ब्ल्यू जॅस्मिन नावाच्या चित्रपटामधील भूमिकेसाठी ब्लॅंचेटला सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: