UEFA Fußball-Europameisterschaft Bundesrepublik Deutschland 1988 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | पश्चिम जर्मनी |
तारखा | १० जून – २५ जून |
संघ संख्या | ८ |
स्थळ | ८ (८ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | नेदरलँड्स (१ वेळा) |
उपविजेता | सोव्हियेत संघ |
इतर माहिती | |
एकूण सामने | १५ |
एकूण गोल | ३४ (२.२७ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ८,८८,६४५ (५९,२४३ प्रति सामना) |
सर्वाधिक गोल | मार्को फान बास्तेन (५ गोल) |
← १९८४ १९९२ → | |
युएफा यूरो १९८८ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. पश्चिम जर्मनी देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलॅंड्सने सोव्हिएत संघाला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.
आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.
खालील आठ जर्मन शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.
म्युनिक (ऑलिंपिक मैदान | गेल्सनकर्शन | हाम्बुर्ग | फ्रांकफुर्ट |
---|---|---|---|
ड्युसेलडॉर्फ | हानोव्हर | श्टुटगार्ट | क्योल्न |
उपांत्य सामने | अंतिम सामना | ||||||
२१ जून – हांबुर्ग | |||||||
पश्चिम जर्मनी | १ | ||||||
नेदरलँड्स | २ | ||||||
२५ जून – म्युनिक | |||||||
नेदरलँड्स | २ | ||||||
सोव्हियेत संघ | ० | ||||||
२२ जून – श्टुटगार्ट | |||||||
इटली | ० | ||||||
सोव्हियेत संघ | २ |