लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस | |
---|---|
| |
प्रकार | लष्करी वाहतूक विमान |
उत्पादक देश | अमेरिका |
उत्पादक | लॉकहीड मार्टिन |
पहिले उड्डाण | २३ ऑगस्ट १९५४ |
सद्यस्थिती | सेवेत आहे |
उपभोक्ते | अमेरिकी वायुसेना अमेरिकी मरिन कॉर्प्स रॉयल वायुसेना रॉयल कॅनडियन वायुसेना |
उत्पादन काळ | १९५४ - सद्य |
उत्पादित संख्या | २,५०० पेक्षा जास्त, २०१५ पर्यंत[१] |
प्रति एककी किंमत | सी-१३०इ: $१.१९ कोटि[२] सी-१३०एच: $३.०१ कोटि[२] |
लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस हे अमेरिकेच्या लॉकहीड कॉर्पोरेशन (आताची लॉकहीड मार्टिन)ने तयार केलेले चार टर्बोप्रॉप इंजिने असलेले लष्करी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची ने-आण करणारे हे विमान असल्या-नसल्या धावपट्टीवरून चढू-उतरू शकते.
या विमानाचे अनेक इतरही उपयोग करून घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप[मराठी शब्द सुचवा] आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६०हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. भारतीय वायुसेनेने सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करून घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |